जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ,चार जुगारांना घेतले ताब्यात
प्रतिनिधी:- शारुखखान पठाण वरोरा
वरोरा:- तालुक्यातील चीनोरा या गावात काही युवक अवैध रित्या जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्याआधारे पोलिसांनी दि. 13जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता दरम्यान धाड टाकून 4 जुवा ऱ्यास अटक केली. रतन रामदास मंजुळकर वय २७ वर्ष, रा. टेंमुर्डा हुडकी ता. वरोरा , अशोक पुंडलीक यादव वय ६३ वर्ष रा. सरदार पटेल वार्ड वरोरा, अतुल रामकृष्ण दाते वय ३२ वर्ष रा. माडा कॉलनी वरोरा , संदीप रामभाउ लेंडांगे वय ३८ वर्ष रा. पाचगांव ठागरे ता. वरोरा, सुरज मुन्ना गोंडाने वय ३८ वर्ष रा. मालविय वार्ड वरोरा हे चिनोरा गावतील झुडपात पैशाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी अटक करून त्यांचेवर कलम १२ (अ) जुगार अधिनियम अन्वये विरुध्द गुन्हा दाखल केला .
Related News
वसमतमध्ये कत्तलीसाठी जनावरे डांबून ठेवल्याचा आरोप,नगर उपाध्यक्षांविरुद्ध गुन्हा,१९ जनावरांची सुटका
17 hrs ago | Sajid Pathan
रेल्वे स्थानक परिसरातून अवैध मद्यसाठा जप्त,बिहारमधील दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
3 days ago | Sajid Pathan
जूनोना–चंद्रपूर मार्गावर दुचाकी अपघात,उपचारासाठी निघालेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
5 days ago | Sajid Pathan